पोस्ट्स

2023 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अमेरिकेच्या हवाई द्वीपसमूहातील माऊवी मध्ये लागलेल्या वणव्यात शहर जळून राख

इमेज
  अमेरिकेच्या अधिपत्याखालील हवाई द्वीपसमूहातील माऊवी (Maui) येथे लागलेल्या वणव्यात किमान 80 लोकांचा बळी गेला आहे आणि हजारो घरे आणि व्यवसाय नष्ट झाले आहेत. डोरा चक्रीवादळाच्या जोरदार वाऱ्यांमुळे लागलेली आग 8 ऑगस्ट 2023 रोजी सुरू झाली आणि त्वरीत संपूर्ण बेटावर पसरली. सर्वात विध्वंसक आग लाहैना शहरात लागली, जिथे त्याने संपूर्ण परिसर भस्म करून टाकला. आगीचा वेग आणि तीव्रता पाहून अनेक रहिवाशांना सावध केले गेले आणि त्यांना इशारा देऊन पळून जाण्यास भाग पाडले गेले. मृतांमध्ये दोन आठवड्यांपूर्वीच लग्न झालेले एक तरुण जोडपे, चार जणांचे कुटुंब आणि वाढदिवस साजरा करणाऱ्या मित्रांचा समावेश आहे. पीडित समाजातील सर्व स्तरातले आहेत आणि त्यांचे नुकसान हृदयद्रावक आहे. जंगलातील आगीमुळे बेटाच्या अर्थव्यवस्थेवरही विनाशकारी परिणाम झाला आहे. माऊवी उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेल्या पर्यटन उद्योगाला विशेष फटका बसला आहे. अनेक व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत आणि वणव्याच्या भीतीने पर्यटक बेटापासून दूर राहत आहेत. जंगलातील आगींचे कारणांचा अद्याप तपास चालू आहे, परंतु असे मानले जाते की ते कोरडे हवामान, उच्च वारे आणि मानवी...

इटलीतल्या गावाने केली सूर्याची व्यवस्था

इमेज
विगानेला (Viganella), इटलीमध्ये वसलेले एक छोटेसे गाव, मिलानच्या उत्तरेस 130 किमी अंतरावर खोल दरीच्या पायथ्याशी आहे. पाहायला गेले तर व्हिगानेला एक रमणीय, टुमदार गाव आहे. तरीही या गावाच्या वैशिष्टयपूर्ण भौगोलिक स्थानामुळे येथील रहिवाशांना शतकानुशतके एका कठीण गोष्टीला तोंड द्यावे लागत होते.  विगानेला एका उंच डोंगराच्या प्रतिकूल बाजूला आहे.दरीमध्ये वसले असल्यामुळे आजूबाजूच्या डोंगरांची लांब सावली गावावर पडते. हिवाळ्यात तर तीन महिने सूर्याचे दर्शनच होत नाही. 11 नोव्हेंबर ते 2 फेब्रुवारीपर्यंत, गावात उन्हाचा बारीक कवडसा देखील येत नाही. सूर्याचे दर्शन न होणे ही आर्क्टिक वर्तुळातील देशांना नवी गोष्ट नाही. परंतु इटली आर्क्टिक प्रदेशात नाही. पिढ्यानपिढ्या, अशा सुर्यरहित हिवाळ्याची सवय झालेल्या गावकर्यांना 2005 मध्ये, महापौर पिअरफ्रान्को मिडाली यांनी नवीन स्वप्न दाखवले. सुमारे १ लाख युरो चा (८० लाख रुपये) निधी खर्चून या गावाने नोव्हेंबर 2006 पर्यंत, 1,100 मीटर उंचीवर पर्वताच्या विरुद्ध उतारावर 40 चौरस मीटर, 1.1 टन वजनाचा आरसा बसवला. संपूर्ण गाव उजळण्यासाठी हा आरसा अपुरा असला तरी, चर्चसमोरील म...

टायटॅनिक पाहायला गेलेल्या पर्यटकांना जलसमाधी

इमेज
अटलांटिक महासागराच्या तळाशी सुमारे १३ हजार फूट खोलवर पसरलेल्या टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांचे दर्शन घ्यायला गेलेल्या ५ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे असे आज जाहीर करण्यात आले. अटलांटिक महासागरात गेल्या शतकभरापूर्वी बुडालेली टायटॅनिक अजूनही जगभरात कुतूहलाचा विषय आहे. १९९७ साली आलेल्या याच नावाच्या सिनेमामुळे टायटॅनिक परत एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर या विषयावर कितीतरी डॉक्युमेंटरी निघाल्या.  १९१२ साली अटलांटिक महासागरात अज्ञात ठिकाणी बुडालेल्या टायटॅनिक चे अवशेष १९८५ साली फ्रेंच-अमेरिकन शोधपथकांना सापडले. हे शोधकार्य आणि एक तरल प्रेमकथा गुंफलेल्या कथेवर टायटॅनिक सिनेमाने जगभरात तुफान कमाई तर केलीच वर जगभरातल्या साहसवेड्या लोकांना नवीन आकर्षण दिले. समुद्रात १३००० फूट खोलवर जमीनवर असतो त्यापेक्षा ४०० पट जास्त दाब असतो. त्यामुळे अगदी भल्याभल्या लष्करी पाणबुड्या देखील अशा खोलीवर जात नाहीत. पर्यटनासाठी आणि संशोधनासाठी खास धातू आणि कॉम्पोसिट्स पासून बनवलेल्या भक्कम छोट्या पाणबुड्याच तिथे पोहोचु शकतात. अशाच एका ' टायटन ' नावाच्या पाणबुडीने ५ दिवसापूर्वी (१८ जून २०२३) या खो...

जॅक निकोल्सन आईलाच समजत होता बहीण

इमेज
अजाणत्या वयात झालेल्या चुकीमुळे बाळ जन्माला आले. आईने आपल्या मुलीसाठी तिचे अपत्य स्वतःचे म्हणून वाढवले आणि समाजाच्या जाचक नजरांपासून मुलीला वाचवले. आपल्या मुलाला भावासारखे वाढवून त्या मुलीने देखील आपले कर्तव्य पार पाडले. आपली बहीणच ही आपली जन्मदात्री आहे आणि जिला आपण आई समजतोय ती आपली आज्जी आहे हे या मुलाला पूर्ण बालपण सरल्यावर कळले. चित्रपटाला शोभेल अशी हि कहाणी हॉलीवूडचा एके काळचा सुपरस्टार 'जॅक निकोल्सन' याची. जॅक निकोल्सन या गुणी अभिनेत्याने हॉलीवूडचे ७० आणि ऐशी चे दशक त्याच्या - द वन फ्ल्यू ओव्हर ककूस नेस्ट, द शायनिंग, फाईव्ह इसी पीसेस यासारख्या चित्रपटांनी गाजवले आणि नव्वदच्या दशकात द डिपार्टेड, फ्यु गुड मेन, ऍस गुड ऍस इट गेट्स सारख्या चित्रपटांतून ते एकविसाव्या शतकातील अँगर मॅनेजमेंट, बकेट लिस्ट या तद्दन कॉमेडी चित्रपटातून त्याने स्वतःची  एक विशिष्ट ओळख निर्माण केली. अभिनयासाठी १२ ऑस्कर नामांकने, आणि ३ ऑस्कर मिळवणारा जॅक निकोल्सन हा हॉलीवूडच्या श्रेष्ठतम कलाकारांपैकी एक गणला जातो. या अभिनेत्याचे बालपण मात्र अशा अजब संयोगाचे होते. जॅक निकोल्सन चा जन्म १९३७ चा. त्याची आई (...

युरोपमध्ये AI च्या वापरावर वर आणली जातायेत कडक बंधने

इमेज
युरोपियन युनियन च्या संसदेने AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित तंत्रज्ञानाच्या वापरवावर बंधने घालण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. सार्वजनिक ठिकाणी फेशल रेकग्निशन (चेहरे ओळखण्याचे तंत्र) वापरला त्यांनी बंदी घातली आहे. युरोपियन संसदेने तंत्रज्ञानासाठी जागतिक मानक सेट करण्याच्या उद्देशाने नियम मंजूर केले आहेत , ज्यामध्ये स्वयंचलित वैद्यकीय निदानापासून काही प्रकारचे ड्रोन, AI ने बनवलेले व्हिडिओ आणि ChatGPT सारख्या बॉट्सचा समावेश आहे. EU AI कायद्यांबाबत आघाडीवर आहे. अमेरिका अजूनही असे कायदे आणायचा विचार करत आहे. युरोपियन युनियन ने AI आधारित अशा तंत्रज्ञानावर बंदी घालायला सुरुवात केली असली तरी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सुरक्षा दलांना या तंत्रज्ञानाचा होणारा उपयोग लक्षात घेता काही राजकीय गट मात्र अशा प्रकारच्या सरसकट बंदीच्या विरोधात आहेत.  भावना ओळखण्याचे तंत्र, ज्याचा उपयोग चीनच्या काही भागांमध्ये थकलेल्या ट्रक चालकांना ओळखण्यासाठी केला जातो, यावर देखील बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे. प्रस्तावित कायद्यानुसार कामाच्या ठिकाणी थकलेल्या कर्मचाऱ्यांना ओळखण्यासाठी अशा तंत्रज्ञा...

टँकर च्या आगीमुळे अमेरिकेत कोसळला महत्वाचा पूल

इमेज
अमेरिकेतील फिलाडेल्फियामधील उत्तरेकडे जाणारा I-95 चा एक भाग रविवारी सकाळी (११ जून २०२३) महामार्गाच्या खाली एका टँकर ट्रकला आग लागल्याने कोसळला. त्याची दुरुस्ती करण्यासाठी काही महिने लागू शकतात, प्रादेशिक प्रवासांना त्रास होऊ शकतो आणि ईस्ट कोस्ट प्रदेशाची महत्वाची रहदारी लाईन अस्ताव्यस्त होऊ  शकते, असे पेनसिल्व्हेनियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पेट्रोलियम-आधारित उत्पादन घेऊन जाणारा व्यावसायिक टँकर ट्रक अजूनही कोसळलेल्या महामार्गाखाली अडकला आहे असे राज्यपाल जोश शापिरो यांनी रविवारी दुपारी पत्रकार परिषदेत सांगितले. सकाळी 6:20 च्या सुमारास झालेल्या आगीमध्ये आणि कोसळलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी अधिकारी काम करत आहेत, असे राज्यपाल म्हणाले. अधिका-यांनी या अपघातात टँकर च्या ड्रायव्हर व्यतिरिक्त कोणालाही दुखापत झाल्याची माहिती दिलेली नाही. महामार्ग पूर्णपणे दुरुस्त करण्यासाठी "काही महिने लागतील," शापिरो यांनी नमूद केले. ते म्हणाले की त्यांचे राज्य अधिकारी "बाह्यवळण रस्ता जोडण्यासाठी पर्याय शोधत आहेत" आणि या विषयावर फेडरल अधिकाऱ्यांसोबत काम करत आहे...

जावयाला सासऱ्याच्या घरी सापडला दहा लाख कॉईन्स चा खजिना

इमेज
अमेरिकेत एका व्यक्तीला त्याच्या दिवंगत सासऱ्याच्या घरी साफ सफाई करताना तब्बल दहा लाख पेनीज (त्यांब्याची नाणी)  सापडली आहेत. जॉन रेयस, 41, एक इस्टेट एजंट आहेत. ते आणि त्यांची पत्नी एलिझाबेथ गेल्या वर्षी एलिझाबेथ यांच्या वडिलांच्या घराच्या गॅरेजमध्ये होते तेव्हा त्यांनी काही पेपर रोलमध्ये भरलेल्या पेनीज दिसल्या. त्यांनी  तिथे आणखी शोधाशोध केली तेव्हा त्यांना तांब्याचे पेनी भरलेले डझनभर बॅग्स सापडले - ज्याचे मूल्य सध्याच्या किमतीनुसार ते दहा हजार डॉलर (सव्वा आठ लाख रुपये) असल्याचा अंदाज आहे. रेयस यांनी म्हंटले “या नाणी भरलेल्या पिशव्यांवर मी कधीही नाव न ऐकलेल्या किंवा आता अस्तित्वात नाही अशा बँकांची नावे आहेत. अक्षरशः एक एक बॅग, आम्हाला त्यांना तळघरातून, पायऱ्यांवरून आणि ट्रकमध्ये आणावी लागली आणि यात आम्हाला काही तास लागले." त्यांनी आतापर्यंत अनेक बँकांकडे ही नाणी घेऊन रोख पैसे देण्याचा प्रस्ताव मांडला आहे परंतु सगळ्या बँकांनी एवढी नाणी घेण्यास नकार दिला. श्री रेयस यांनी लॉस एंजेलिसमधील वेल्स फार्गो बँकेच्या शाखेला कॉल केला, परंतु व्यवस्थापकाने सांगितले की त्यांच्याकडे सर्व नाण्य...

अमेरिकेत AI आधारित मशिन्स करतायेत शेतातील तणाचा बंदोबस्त

इमेज
शेतातील कामे करायला मजूर न मिळणे ही आता शेतकऱ्यांसाठी नेहमीची डोकेदुखी होऊन बसलीये. अशा वेळी शेतातील तण, गवत काढण्याची कामे रोबॉट करायला लागले तर?  ही आता एखाद्या विज्ञानपटातील कल्पना राहिली नाहीये. अमेरिकेत AI आधारित मशीन्स ने आता शेतातील तण काढायची कामे चालू केली आहेत.  या मशीन्स दिसायला माणसासारख्या नाहीत. उच्च क्षमतेचे संगणक, लेझर, आणि लेझरसाठी लागणारी वीज तयार करणाऱ्या यंत्रणा बसवलेले चाकांवरचे बॉक्स आहेत. कॅमेऱ्यांद्वारे तण आणि पीक यातला फरक ओळखून नेमके तणावर लेझर मारणाऱ्या या मशीन्स आहेत. ८० प्रकारची पिके आणि ४० प्रकारचे तण ओळखण्याची क्षमता या मशीन्स च्या कॉम्प्युटर मध्ये आहे. एकदा का हि मशीन शेतात आली की तण जाळायला सुरुवात करून अनेक मजुरांचे काही शे तासाचे काम फक्त एक कॉम्प्युटर ऑपरेटर आणि ड्राइवर द्वारे काही तासात अगदी अचूक रित्या करू शकतात. हे मशीन काम करत असताना संपूर्ण परिसरात पॉपकॉर्न भाजल्यासारखा वास येतो असे NBC न्यूज चे वार्ताहर म्हणाले.सायनिक तणनाशकांचे पिकावर होणारे परिणाम आपल्याला काहीनवीन नाहीत त्यामुळे कोणतेही रसायन न वापरून अचूक पद्धतीने शेतातील गवत ...

ऍमेझॉन जंगलात हरवलेली ४ मुले सापडली ४० दिवसानंतर

इमेज
  दक्षिण अमेरिका खंडातील कोलंबिया देशात १ मे २०२३ रोजी एक विमान पडले. ऍमेझॉन जंगलातल्या घनदाट भागात पडलेल्या त्या छोट्या विमानात एकूण ७ प्रवासी होते. त्यात कोलंबियातल्या आदिवासी जमातीतील एक आई आणि तिची ४ लहान मुले देखील या अपघातात सापडली. या अपघातात विमानातले तिन्ही वयस्कर दगावले तर सुदैवाने चारही मुले वाचली. विमानाचे अवशेष सापडायलाच शोधपथकांना २ आठवडे लागले. कोलंबियाच्या सैन्यातील जवान, स्थानिक लोक, या कुटुंबाच्या गावातील लोक जेव्हा या विमानाच्या अवशेषांपाशी पोचले तेव्हा विमानातच त्यांना या आई, पायलट आणि आणखी एक जण असे ३ प्रौढांचे मृतदेह विमानातच सापडले पण मुले कुठेही दिसली नाहीत. सर्वात मोठा १३ वर्षाचा, दुसरा ९,तिसरी ४ आणि चौथा चक्क ११ महिन्यांचे बाळ हे चारही जण अपघातानंतर ४० साव्या दिवशी सुखरूप शोधपथकांना सापडले तेव्हा कोलंबियामध्ये एकच जल्लोष झाला आहे. आणि जगात सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या जीवघेण्या अपघातातून वाचून त्यानंतर विषारी कीटक, बिबटे, अन्य वन्य श्वापदे भरलेल्या या जंगलात या लहानग्यांनी कसे दिवस काढले असतील हा सर्वत्र कुतूहलाचा विषय आहे. सूर्याची किरणे जमिनीव...

लिंक्डइन वर he him, she her लावताय? आधी प्रकरण समजून घ्या

इमेज
पाश्च्यात्य राष्ट्रांमध्ये सध्या प्राईड मंथ चालू आहे. कोपऱ्याकोपऱ्यातून चालू झालेली LGBTQ (आणि बरेच काही) ची चळवळ आता जोर धरू लागली आहे आणि त्यामुळे परंपरावादी Conservative आणि उदारमतवादी Liberals यांच्यामध्ये अमेरिकेत खडाजंगीच्या घटना देखील घडत आहेत. मागच्या काही वर्षात हे "प्रेफर्ड प्रोनाउन्स" (Preferred Pronouns) ची टूम पाश्चात्य राष्ट्रांमध्ये काही गटांमधून निघाली. तर या गटांचे म्हणणे असे आहे की एखादा पुरुषाला तो स्त्री आहे असे वाटू शकते. तसेच एखाद्या स्त्रीला तो पुरुष आहे असे वाटू शकते. एखाद्याने लिंगबदल करून घेतले असेल, आणि एखाद्याला पुरुष किंवा स्त्री दोन्हीही संबोधने नकोशी वाटतील. तर अशा लोकांना समाजाने समजून घ्यावे आणि त्यांनी स्वतः सांगिलेल्या संबोधनाने ओळखावे. त्यातून She, Her, He, Him या सामान्यपणे वापरलेल्या संबोधनाबरोबर काही लोक they, them, it वापरातायेत आणि काहींनी चक्क zer, ze अशी मनमानी संबोधने शोधली. आणि सध्या परिस्थिती अशी आहे कि अशी स्वघोषित ७० संबोधने आहेत.

अमेरिकन जनता पडतीये AI च्या प्रेमात

इमेज
२०१३ मध्ये जेव्हा "Her" हा सिनेमा रिलीज झाला होता, तेव्हा AI आधारित चॅटबॉट चांगलेच चर्चेत आले होते. आपल्या रोजच्या कामासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉटचा सहाय्यक म्हणून वापर करताना एका लेखकाला या रोबॉट च्या "मानवी" भावभावना समजून घेण्याची, त्या स्मरणात ठेवण्याची आणि तशा भावना दाखवण्याच्या क्षमतेचे कौतुक वाटायला लागते. पुढे तो या चॅटबॉट च्या प्रेमातच पडतो. अशा आशयाचा हा सिनेमा. स्कार्लेट जॉन्सन च्या नुसत्या आवाजात एवढी जादू होती की ऑस्कर विजेता अभिनेता वाकिन फिनिक्स ने (Joaquin Phoenix) साकारलेला हा लेखक या चॅटबॉट च्या प्रेमात पडणे ही अगदी स्वाभाविक गोष्ट वाटायला लागते.   तरीपण, या सिनेमात दाखवलेली AI सिस्टिम प्रत्यक्षात यायला ३-४ दशके अवकाश आहे असे बऱ्याच जणांना वाटले असेल. काहींनी तर ही एक कपोल कल्पना म्हणून कधी याचा गांभीर्याने विचार देखील केला नसेल. आज जेमतेम १० वर्षात chatGPT सारख्या तंत्रज्ञानाने जगाला गदगदून हलवून उठवावे तसे उठवले आहे. "Her" या सिनेमात दाखवलेल्या आणि त्याहीपेक्षा उन्नत तंत्रज्ञानाची नांदी झाली आहे आणि नवनवीन गोष्टी जवळजवळ प्र...

कॅनडातल्या वणव्याचा अमेरिकेत धूर

इमेज
चित्र NBC न्यूज वरून साभार कॅनडातील प्रखर वणव्यामुळे हवेत पसरलेला धूर आता उत्तर अमेरिकेवर पसरला आहे. हवेच्या गुणवत्तेच्या खराब पातळीमुळे उत्तर अमेरिकेतील लाखो लोकांना घराबाहेर N95 मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. न्यूयॉर्क गुरुवारी मोफत मास्कचे वितरण सुरू करेल. कॅनडा सरकारने म्हटले आहे की लोकांना घरामध्ये राहता येत नसेल तर मास्क घालावा. बहुतेक धूर क्विबेकमधून येत आहे, जिथे सर्वात जास्त जंगले जळत आहेत. गेल्या सहा आठवड्यांमध्ये, कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेल्या वणव्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरु झाले आहे. 3.3 दशलक्ष हेक्टरपेक्षा जास्त जमीन (अमेरिकेच्या मेरीलँड राज्यापेक्षा मोठे क्षेत्र) जळून खाक झाली आहे. कॅनडातील जंगलातील आगीचा हंगाम मे ते ऑक्टोबर दरम्यान चालतो, परंतु या हंगामाच्या सुरुवातीलाच असा विनाश दुर्मिळ घटना आहे. कॅनडा इतिहासातील सर्वात विनाशकारी वणव्याचा हंगाम सुरू करण्याच्या मार्गावर आहे. हवामानातील बदलामुळे पृथ्वीचे वाढलेले तापमान आणि दुष्काळ यामुळे वणव्याची असे अनुकूल वातावरण तयार झाले आहे, असा अनेकांचा कयास आहे. हे संकट फक्त कॅनाडापुरते मर्यादित नाही. आगीचा...

गेम खेळताय? आता विमान सांभाळा

इमेज
  "अरे किती वेळ गेम खेळत बसणार आहेस, त्या गेमने काय पोट भरणार आहे का?" तुमच्या मुलांना व्हिडिओ गेम खेळायला आवडत असल्यास, त्यांना मारून मुटकून अभ्यासाला बसवण्यापूर्वी ही बातमी वाचा. NBC न्यूजच्या एका अहवालात, अमेरिकेतील FAA (फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशन) पुढील पिढीच्या हवाई वाहतूक नियंत्रकांसाठी गेमर भरती करण्याचा विचार करत आहे. विमानातळावर उंच दांड्यावर तबकडी ठेवल्यासारखी दिसणारी इमारत पाहिलीच असेल. या इमारतीत विमानांचे ट्राफिक नियंत्रण करणारे कर्मचारी असतात. त्यांचे काम अतिशय महत्वपूर्ण असते. येणाऱ्या जाणाऱ्या विमानांच्या पायलट्स ला अचूक मार्गदर्शन करणे, समोरच्या स्क्रीन्सवर बारीक नजर ठेवून ग्राउंड क्र्यु आणि विमानांचा समन्वय साधणे हे त्यांचे काम. हे फ्लाईट कंट्रोलर कर्मचारी पहात असलेली स्क्रीन जवळपास गेमच्या  स्क्रिनप्रमाणेच दिसते, त्यामुळे या कामासाठी आता गेमर्स ची भरती केली जात आहे. 18-30 वयोगटातील तरुणांना या कामासाठी लक्ष्य केले जात आहे. हा विशिष्ट वयोगट का? फ्लाईट कंट्रोलर बनण्यासाठी, साधारण ३१ व्या वर्षापर्यंत एंट्री मिळणे आवश्यक आहे आणि वयाच्या ५६ व्या वर्षी निवृत्त...

ऍपल चे व्हिजन प्रो

इमेज
२०१५ मध्ये अनावरण केलेल्या Apple वॉच नंतर, तब्बल ८ वर्षांनी सोमवारी ५ जून २०२३ रोजी, ऍपलने प्रमुख नवीन उत्पादन श्रेणी, व्हिजन प्रो, या त्यांच्या बहुप्रतीक्षित मिक्स्ड रियालिटी (मिश्र वास्तविकता) हेडसेटचे अनावरण केले. कॅमेरे आणि सेन्सर्सने भरलेले हे नवीन उपकरण स्की गॉगल्ससारखे दिसते. सीईओ टिम कुक यांनी कंपनीच्या क्युपर्टिनो, कॅलिफोर्निया येथील स्पार्कलिंग ऍपल पार्क मुख्यालयात आयोजित केलेल्या जागतिक डेव्हलपर्स परिषदेमध्ये या नवीन उत्पादनाची घोषणा केली. चित्र - apple.com वरून साभार Apple वर्च्युयल रिअ‍ॅलिटी स्पेस मध्ये साधारण एक दशकापूर्वीपासून वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहे. 2016 पर्यंत, कंपनीने हलक्या वजनाच्या चष्मा आणि मोठ्या सपोर्टींग उपकरणासाठी पेटंट दाखल केले. ऍपल चे सीईओ टीम कूक यांनी अधिक कॉम्पॅक्ट पर्यायाला प्राधान्य दिले असताना, तांत्रिक आव्हानामुळे ऍपल ने आपली रणनीती बदलली असल्याचे दिसून येत आहे. मेटा आणि अल्फाबेट (गूगल ची पालक कंपनी) सह इतर सिलिकॉन व्हॅलीच्या बाप कंपन्या अशा प्रकारचे हेडसेट विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत.२०१४ मध्ये फेसबुक (आताची मेटा) ने स्टार्टअप ऑक्युलस ...

६ फायटर विमानांच्या पहाऱ्यात पडले नागरी विमान

इमेज
 अमेरिकेच्या वॉशिंग्टन प्रांतात काळ ४ जून रोजी आगळी घटना घडली. दिवसाढवळ्या काहीही अंदाज नसताना आकाशात मोठ्ठा स्फोट झाल्यासारखा आवाज झाला. हा आवाज एवढा मोठा होता कि काहींना भूकंप झाल्यासारखे वाटले तर काहींना बॉम्ब फुटल्याचा आभास झाला. हा आवाज बऱ्याच कॅमेऱ्यांनी रेकॉर्ड देखील केला. हा आवाज होता सॉनिक बूमचा. लढाऊ विमानांनी जर ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेग पकडला तर हवेचा गतिरोध मोडीत काढताना हा स्फोटासारखा आवाज होतो. अमेरिकेच्या वॉशिंग्टन प्रांतावर सरकारी संवेदनशील प्रदेशावर एक खाजगी विमान भरकटले असल्याचे नक्की झाल्यावर अमेरिकन हवाई दलाच्या F१६ विमानांनी आकाशात उड्डाण केले. व्हर्जिनियामध्ये क्रॅश होण्यापूर्वी लढाऊ विमानांनी पाठलाग केलेल्या खासगी विमानाचा पायलट कॉकपिटमध्ये बेशुद्ध असल्याचे दिसले, असे अमेरिकन मीडिया अहवालात म्हटले आहे. वॉशिंग्टन पोस्ट आणि सीएनएनसह अधिकार्‍यांनी सांगितले की, विमानाला इंटरसेप्ट केल्यानंतर बेशुद्ध झालेल्या पायलटला लढाऊ विमानांनी पाहिले. रविवारी झालेल्या या अपघातात पायलट आणि अन्य तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. सेस्ना सदृश या खाजगी जेट विमानाने व्हर्जिनियामध्ये...