युरोपमध्ये AI च्या वापरावर वर आणली जातायेत कडक बंधने
युरोपियन युनियन च्या संसदेने AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित तंत्रज्ञानाच्या वापरवावर बंधने घालण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे.
सार्वजनिक ठिकाणी फेशल रेकग्निशन (चेहरे ओळखण्याचे तंत्र) वापरला त्यांनी बंदी घातली आहे.
युरोपियन संसदेने तंत्रज्ञानासाठी जागतिक मानक सेट करण्याच्या उद्देशाने नियम मंजूर केले आहेत , ज्यामध्ये स्वयंचलित वैद्यकीय निदानापासून काही प्रकारचे ड्रोन, AI ने बनवलेले व्हिडिओ आणि ChatGPT सारख्या बॉट्सचा समावेश आहे.
EU AI कायद्यांबाबत आघाडीवर आहे. अमेरिका अजूनही असे कायदे आणायचा विचार करत आहे.
युरोपियन युनियन ने AI आधारित अशा तंत्रज्ञानावर बंदी घालायला सुरुवात केली असली तरी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सुरक्षा दलांना या तंत्रज्ञानाचा होणारा उपयोग लक्षात घेता काही राजकीय गट मात्र अशा प्रकारच्या सरसकट बंदीच्या विरोधात आहेत.
भावना ओळखण्याचे तंत्र, ज्याचा उपयोग चीनच्या काही भागांमध्ये थकलेल्या ट्रक चालकांना ओळखण्यासाठी केला जातो, यावर देखील बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे. प्रस्तावित कायद्यानुसार कामाच्या ठिकाणी थकलेल्या कर्मचाऱ्यांना ओळखण्यासाठी अशा तंत्रज्ञानाच्या वापरावर देखील बंदी घालण्यात येईल.
AI कमिटीचे सदस्य ड्रॅगोस टुडोराचे, म्हणाले की जर कायदा आधीच अंमलात आला असता तर 2024 ऑलिम्पिकमध्ये गर्दीच्या पाळत ठेवण्यासाठी लाईव्ह फेशल रेकग्निशन सक्षम करण्यासाठी फ्रेंच सरकार यावर्षी कायदा करू शकले नसते.
कॉपीराइट उल्लंघनाच्या शक्यतांचा सामना करण्यासाठी, हा कायदा AI चॅटबॉट्सच्या विकासकांना त्यांनी AI चॅटबॉट विकसित करताना ज्या शास्त्रज्ञ, संगीतकार, चित्रकार, छायाचित्रकार आणि पत्रकार यांचे काम वापरले ते सर्व कार्य प्रकाशित करण्याचे बंधन राहील. त्यांना हे देखील सिद्ध करावे लागेल की त्यांनी मशीनला प्रशिक्षण देण्यासाठी जे काही केले ते कायद्याचे पालन करून केले आहे.
त्यांनी तसे न केल्यास, त्यांना तात्काळ असे एप्लिकेशन्स हटविण्यास भाग पाडले जाऊ शकते किंवा त्यांच्या कमाईच्या 7% पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. असा दंड टेक दिग्गज कंपन्यांच्या केस मध्ये लाखो युरोपर्यंत जाऊशकतो. "ही बंधने खूप कडक आहेत" टुडोराचे म्हणाले.
एका बाजूला AI आधारित सॉफ्टवेयर जगात नवीन क्रांती आणून बऱ्याच गोष्टी सोप्या करण्याच्या मार्गावर आहेत तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या वापरावर बांध घालून या सिस्टिम्स ला कमकुवत करण्यात येत आहे.
चित्रे pixabay.com वरून साभार.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा