टँकर च्या आगीमुळे अमेरिकेत कोसळला महत्वाचा पूल


अमेरिकेतील फिलाडेल्फियामधील उत्तरेकडे जाणारा I-95 चा एक भाग रविवारी सकाळी (११ जून २०२३) महामार्गाच्या खाली एका टँकर ट्रकला आग लागल्याने कोसळला. त्याची दुरुस्ती करण्यासाठी काही महिने लागू शकतात, प्रादेशिक प्रवासांना त्रास होऊ शकतो आणि ईस्ट कोस्ट प्रदेशाची महत्वाची रहदारी लाईन अस्ताव्यस्त होऊ  शकते, असे पेनसिल्व्हेनियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पेट्रोलियम-आधारित उत्पादन घेऊन जाणारा व्यावसायिक टँकर ट्रक अजूनही कोसळलेल्या महामार्गाखाली अडकला आहे असे राज्यपाल जोश शापिरो यांनी रविवारी दुपारी पत्रकार परिषदेत सांगितले.

सकाळी 6:20 च्या सुमारास झालेल्या आगीमध्ये आणि कोसळलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी अधिकारी काम करत आहेत, असे राज्यपाल म्हणाले. अधिका-यांनी या अपघातात टँकर च्या ड्रायव्हर व्यतिरिक्त कोणालाही दुखापत झाल्याची माहिती दिलेली नाही.

महामार्ग पूर्णपणे दुरुस्त करण्यासाठी "काही महिने लागतील," शापिरो यांनी नमूद केले. ते म्हणाले की त्यांचे राज्य अधिकारी "बाह्यवळण रस्ता जोडण्यासाठी पर्याय शोधत आहेत" आणि या विषयावर फेडरल अधिकाऱ्यांसोबत काम करत आहेत.

पेनसिल्व्हेनिया विभागाचे परिवहन सचिव माईक कॅरोल यांच्या म्हणण्यानुसार महामार्गाचा नष्ट झालेला भाग हा "कदाचितअमेरीकेतील सर्वात व्यस्त आंतरराज्यीय भाग" आहे,जिथून दररोज सुमारे एक लाख ६० हजार वाहने जातात.

I-९५ महामार्ग हा अमेरिकेच्या पूर्वभागाची मुख्य धमनी मानला जातो


फिलाडेल्फियाचे महापौर जिम केनी यांनी दिलेल्या माहितीनुसार आग आता नियंत्रणात आली आहे. "आम्ही रहिवाशांना सल्ला देत आहोत की कृपया इथून प्रवास करणे टाळा आणि प्रवासाच्या पर्यायी मार्गांची योजना करा," ते पत्रकार परिषदेत म्हणाले.

फिलाडेल्फियामध्ये बसेस चालवणार्‍या दक्षिणपूर्व पेनसिल्व्हेनिया ट्रान्सपोर्टेशन अथॉरिटीचा संदर्भ देत ते म्हणाले, “रस्ते बंद करण्याव्यतिरिक्त, आम्हाला कचरा संकलन आणि बस मार्गांमध्ये विलंब होणे अपेक्षित आहे.”

"मी देवाचे आभार मानतो की I-95 वर असलेले कोणतेही वाहन चालक जखमी झाले नाहीत किंवा मरण पावले नाहीत," ते म्हणाले.

या अपघाताची पूर्ण बातमी इथे - 


छायाचित्र https://www.reuters.com, nbc news वरून साभार.

टिप्पण्या

Popular Articles on This Site

अमेरिकेच्या हवाई द्वीपसमूहातील माऊवी मध्ये लागलेल्या वणव्यात शहर जळून राख

इटलीतल्या गावाने केली सूर्याची व्यवस्था

टायटॅनिक पाहायला गेलेल्या पर्यटकांना जलसमाधी