अमेरिकेत AI आधारित मशिन्स करतायेत शेतातील तणाचा बंदोबस्त



शेतातील कामे करायला मजूर न मिळणे ही आता शेतकऱ्यांसाठी नेहमीची डोकेदुखी होऊन बसलीये. अशा वेळी शेतातील तण, गवत काढण्याची कामे रोबॉट करायला लागले तर?  ही आता एखाद्या विज्ञानपटातील कल्पना राहिली नाहीये. अमेरिकेत AI आधारित मशीन्स ने आता शेतातील तण काढायची कामे चालू केली आहेत. 

या मशीन्स दिसायला माणसासारख्या नाहीत. उच्च क्षमतेचे संगणक, लेझर, आणि लेझरसाठी लागणारी वीज तयार करणाऱ्या यंत्रणा बसवलेले चाकांवरचे बॉक्स आहेत. कॅमेऱ्यांद्वारे तण आणि पीक यातला फरक ओळखून नेमके तणावर लेझर मारणाऱ्या या मशीन्स आहेत. ८० प्रकारची पिके आणि ४० प्रकारचे तण ओळखण्याची क्षमता या मशीन्स च्या कॉम्प्युटर मध्ये आहे. एकदा का हि मशीन शेतात आली की तण जाळायला सुरुवात करून अनेक मजुरांचे काही शे तासाचे काम फक्त एक कॉम्प्युटर ऑपरेटर आणि ड्राइवर द्वारे काही तासात अगदी अचूक रित्या करू शकतात. हे मशीन काम करत असताना संपूर्ण परिसरात पॉपकॉर्न भाजल्यासारखा वास येतो असे NBC न्यूज चे वार्ताहर म्हणाले.सायनिक तणनाशकांचे पिकावर होणारे परिणाम आपल्याला काहीनवीन नाहीत त्यामुळे कोणतेही रसायन न वापरून अचूक पद्धतीने शेतातील गवत काढून उत्पादन वाढवणाऱ्या या मशिन्स भविष्यात सगळीकडे दिसायला लागतील यात शंका नाही.



सध्या या मशीन्स ची किंमत जास्त वाटत असली तरी भविष्यात या मशिन्स सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्यात येऊ शकतात. LED TV जसे काही वर्षांपर्यंत श्रीमंतच वापरायचे आणि आता अगदी पाल-झोपड्यांमध्ये देखील दिसतात तशाच पद्धतीने शेतीची ही कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अवजारे अगदी लहान शेतकरी देखील वापरायला लागतील असे वाटत आहे.

खालील व्हिडीओ मध्ये दाखवलेली मशीन्स काम करता करता पिकाशी संबंधित आणखी माहिती गोळा करून अधिक उन्नत होत आहेत. हजारो एकर वर २४ तास, रात्रं-दिवस न थकता काम करू शकतात.  माणसांच्या कष्टाचे काम सोपे करणाऱ्या या मशिन्स रोजगार हिरावून घेऊ शकतात पण सध्या शेतकऱ्यांना देखील शेतात काम करायला रोजंदारीवर माणसे मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

प्रगत देशांनी यांत्रिकीकरण करून यावर उपाय केले असले तरी शेतातल्या बऱ्याच गोष्टींसाठी अजूनही मनुष्यबळ लागत आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग या नवीन तंत्रज्ञानामुळे बऱ्याच गोष्टीतून मानवी हस्तक्षेपाची गरज संपत आहे.

आणखी माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.


चित्र NBC न्यूज वरून साभार.



टिप्पण्या

Popular Articles on This Site

अमेरिकेच्या हवाई द्वीपसमूहातील माऊवी मध्ये लागलेल्या वणव्यात शहर जळून राख

इटलीतल्या गावाने केली सूर्याची व्यवस्था

टायटॅनिक पाहायला गेलेल्या पर्यटकांना जलसमाधी