ऍपल चे व्हिजन प्रो
Apple वर्च्युयल रिअॅलिटी स्पेस मध्ये साधारण एक दशकापूर्वीपासून वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहे. 2016 पर्यंत, कंपनीने हलक्या वजनाच्या चष्मा आणि मोठ्या सपोर्टींग उपकरणासाठी पेटंट दाखल केले. ऍपल चे सीईओ टीम कूक यांनी अधिक कॉम्पॅक्ट पर्यायाला प्राधान्य दिले असताना, तांत्रिक आव्हानामुळे ऍपल ने आपली रणनीती बदलली असल्याचे दिसून येत आहे.
मेटा आणि अल्फाबेट (गूगल ची पालक कंपनी) सह इतर सिलिकॉन व्हॅलीच्या बाप कंपन्या अशा प्रकारचे हेडसेट विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत.२०१४ मध्ये फेसबुक (आताची मेटा) ने स्टार्टअप ऑक्युलस २ अब्ज डॉलर्स मध्ये विकत घेतला आणि त्याच्या मेटा क्वेस्टच्या दोन पिढ्या रिलीझ केल्या आहेत, जे मुख्यतः गेमरसाठी सुसज्ज आहेत.
मायक्रोसॉफ्टने २०१६ मध्ये त्याच्या Hololens हेडसेटवर, 3D ऑगमेंटेड रिऍलिटी डिव्हाइसवर मोठी गुंतवणूक लावली, परंतु ग्राहकांना आकर्षित करण्यात ते अयशस्वी ठरले. गूगल ने एका दशकापूर्वी मोठा गाजावाजा केलेले गूगल ग्लास हे उत्पादन सपशेल फेल झाले.
ऍपल नवीन उत्पादनांच्या श्रेणींमध्ये सगळ्यांच्या आधी सहसा पाऊल टाकत नाही. त्याऐवजी ते इतर कंपन्यांना आघाडी घेऊ देतात, मार्केटचा अंदाज घेतात आणि मग एखाद्या कसलेल्या योध्याप्रमाणे बाजरपेठेत सर्वोत्कृष्ठ उतपादने उतरवणून प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करतात. ऍपलने mp3 प्लेयर्स, स्मार्टफोन्स, टॅबलेट आणि स्मार्टवॉचमध्ये आधी वाट पाहिली, परंतु त्यांच्या iPods, iPhones, iPads आणि Apple Watches ने या सर्व श्रेणीमध्ये लवकरच आघाडी मिळवली.
व्हिडीओ - apple.com वरून साभार
ऍपल समोर मोठे आव्हान असेल कारण हेडसेट ही काही फार लोकप्रिय गोष्ट नाही. एक इलेक्ट्रॉनिक गॅजेट थेट आपल्या चेहऱ्यावर लावायला अजूनही ग्राहक फार उत्सुक नाहीत. हेडसेटमुळे अनेकदा जास्त गरम होणे, जास्त वेळ घालायला किचकट वाटणे, किंवा कपाळाला घाम येणे अशा तक्रारी येतात. काही हेडसेट वापरकर्त्यांना वास्तविक जगाशी तुटले गेल्याचा अनुभव आला आहे - काही वेळेसाठी ठीक पण दीर्घ कालावधीसाठी पूर्ण हेडसेट वर काम करणे हे जिकरीचे असू शकते. कूक यांनी या वर्षाच्या सुरुवातीला GQ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की ऍपल हेडसेट या तक्रारींवर मात करू शकते. मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी देखील अशा प्रकारचे नवीन हेडसेट काही दिवसांपूर्वीच बाजारपेठेत आणले आहेत.
आभासी जगावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची ही लढाई कोण जिंकणार याची उत्सुकता आहे.
आणखी माहिती इथे पाहू शकता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा