जॅक निकोल्सन आईलाच समजत होता बहीण

अजाणत्या वयात झालेल्या चुकीमुळे बाळ जन्माला आले. आईने आपल्या मुलीसाठी तिचे अपत्य स्वतःचे म्हणून वाढवले आणि समाजाच्या जाचक नजरांपासून मुलीला वाचवले. आपल्या मुलाला भावासारखे वाढवून त्या मुलीने देखील आपले कर्तव्य पार पाडले. आपली बहीणच ही आपली जन्मदात्री आहे आणि जिला आपण आई समजतोय ती आपली आज्जी आहे हे या मुलाला पूर्ण बालपण सरल्यावर कळले. चित्रपटाला शोभेल अशी हि कहाणी हॉलीवूडचा एके काळचा सुपरस्टार 'जॅक निकोल्सन' याची.



जॅक निकोल्सन या गुणी अभिनेत्याने हॉलीवूडचे ७० आणि ऐशी चे दशक त्याच्या - द वन फ्ल्यू ओव्हर ककूस नेस्ट, द शायनिंग, फाईव्ह इसी पीसेस यासारख्या चित्रपटांनी गाजवले आणि नव्वदच्या दशकात द डिपार्टेड, फ्यु गुड मेन, ऍस गुड ऍस इट गेट्स सारख्या चित्रपटांतून ते एकविसाव्या शतकातील अँगर मॅनेजमेंट, बकेट लिस्ट या तद्दन कॉमेडी चित्रपटातून त्याने स्वतःची  एक विशिष्ट ओळख निर्माण केली. अभिनयासाठी १२ ऑस्कर नामांकने, आणि ३ ऑस्कर मिळवणारा जॅक निकोल्सन हा हॉलीवूडच्या श्रेष्ठतम कलाकारांपैकी एक गणला जातो.



या अभिनेत्याचे बालपण मात्र अशा अजब संयोगाचे होते. जॅक निकोल्सन चा जन्म १९३७ चा. त्याची आई (जिला तो बहीण समजायचा) ही त्यावेळी १७ वर्षाची कुमारी माता असल्याने, त्याच्या आजीने लहानग्या जॅक ला आपला मुलगा म्हणून वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला जो त्याच्या आईने मान्य केला. १९७४ मध्ये, टाईम मासिकाच्या काही वार्ताहरांनी या गोष्टीचा उलगडा झाला आणि त्यांनीच निकोल्सनला कळवले की, त्याची "बहीण", जून ही खरंतर त्याची आई होती आणि तिची दुसरी "बहीण", लॉरेन ही खरोखर त्याची मावशी होती. तोपर्यंत, त्याची आई आणि आजी या दोघांचाही मृत्यू झाला होता (अनुक्रमे १९६३ आणि १९७० मध्ये). हे जाणून घेतल्यावर, निकोल्सन म्हणाले की ही "एक अतिशय नाट्यमय घटना होती, परंतु माझ्यावर मानसिक आघात वगैरे करणारी नव्हती, कारण माझी मानसिकदृष्ट्या तोपर्यंत माझी व्हायची ती वाढ झाली होती".

टिप्पण्या

Popular Articles on This Site

अमेरिकेच्या हवाई द्वीपसमूहातील माऊवी मध्ये लागलेल्या वणव्यात शहर जळून राख

इटलीतल्या गावाने केली सूर्याची व्यवस्था

टायटॅनिक पाहायला गेलेल्या पर्यटकांना जलसमाधी