अमेरिकेत AI आधारित मशिन्स करतायेत शेतातील तणाचा बंदोबस्त
शेतातील कामे करायला मजूर न मिळणे ही आता शेतकऱ्यांसाठी नेहमीची डोकेदुखी होऊन बसलीये. अशा वेळी शेतातील तण, गवत काढण्याची कामे रोबॉट करायला लागले तर? ही आता एखाद्या विज्ञानपटातील कल्पना राहिली नाहीये. अमेरिकेत AI आधारित मशीन्स ने आता शेतातील तण काढायची कामे चालू केली आहेत. या मशीन्स दिसायला माणसासारख्या नाहीत. उच्च क्षमतेचे संगणक, लेझर, आणि लेझरसाठी लागणारी वीज तयार करणाऱ्या यंत्रणा बसवलेले चाकांवरचे बॉक्स आहेत. कॅमेऱ्यांद्वारे तण आणि पीक यातला फरक ओळखून नेमके तणावर लेझर मारणाऱ्या या मशीन्स आहेत. ८० प्रकारची पिके आणि ४० प्रकारचे तण ओळखण्याची क्षमता या मशीन्स च्या कॉम्प्युटर मध्ये आहे. एकदा का हि मशीन शेतात आली की तण जाळायला सुरुवात करून अनेक मजुरांचे काही शे तासाचे काम फक्त एक कॉम्प्युटर ऑपरेटर आणि ड्राइवर द्वारे काही तासात अगदी अचूक रित्या करू शकतात. हे मशीन काम करत असताना संपूर्ण परिसरात पॉपकॉर्न भाजल्यासारखा वास येतो असे NBC न्यूज चे वार्ताहर म्हणाले.सायनिक तणनाशकांचे पिकावर होणारे परिणाम आपल्याला काहीनवीन नाहीत त्यामुळे कोणतेही रसायन न वापरून अचूक पद्धतीने शेतातील गवत ...