जॅक निकोल्सन आईलाच समजत होता बहीण
अजाणत्या वयात झालेल्या चुकीमुळे बाळ जन्माला आले. आईने आपल्या मुलीसाठी तिचे अपत्य स्वतःचे म्हणून वाढवले आणि समाजाच्या जाचक नजरांपासून मुलीला वाचवले. आपल्या मुलाला भावासारखे वाढवून त्या मुलीने देखील आपले कर्तव्य पार पाडले. आपली बहीणच ही आपली जन्मदात्री आहे आणि जिला आपण आई समजतोय ती आपली आज्जी आहे हे या मुलाला पूर्ण बालपण सरल्यावर कळले. चित्रपटाला शोभेल अशी हि कहाणी हॉलीवूडचा एके काळचा सुपरस्टार 'जॅक निकोल्सन' याची. जॅक निकोल्सन या गुणी अभिनेत्याने हॉलीवूडचे ७० आणि ऐशी चे दशक त्याच्या - द वन फ्ल्यू ओव्हर ककूस नेस्ट, द शायनिंग, फाईव्ह इसी पीसेस यासारख्या चित्रपटांनी गाजवले आणि नव्वदच्या दशकात द डिपार्टेड, फ्यु गुड मेन, ऍस गुड ऍस इट गेट्स सारख्या चित्रपटांतून ते एकविसाव्या शतकातील अँगर मॅनेजमेंट, बकेट लिस्ट या तद्दन कॉमेडी चित्रपटातून त्याने स्वतःची एक विशिष्ट ओळख निर्माण केली. अभिनयासाठी १२ ऑस्कर नामांकने, आणि ३ ऑस्कर मिळवणारा जॅक निकोल्सन हा हॉलीवूडच्या श्रेष्ठतम कलाकारांपैकी एक गणला जातो. या अभिनेत्याचे बालपण मात्र अशा अजब संयोगाचे होते. जॅक निकोल्सन चा जन्म १९३७ चा. त्याची आई (...