इटलीतल्या गावाने केली सूर्याची व्यवस्था
विगानेला (Viganella), इटलीमध्ये वसलेले एक छोटेसे गाव, मिलानच्या उत्तरेस 130 किमी अंतरावर खोल दरीच्या पायथ्याशी आहे. पाहायला गेले तर व्हिगानेला एक रमणीय, टुमदार गाव आहे. तरीही या गावाच्या वैशिष्टयपूर्ण भौगोलिक स्थानामुळे येथील रहिवाशांना शतकानुशतके एका कठीण गोष्टीला तोंड द्यावे लागत होते. विगानेला एका उंच डोंगराच्या प्रतिकूल बाजूला आहे.दरीमध्ये वसले असल्यामुळे आजूबाजूच्या डोंगरांची लांब सावली गावावर पडते. हिवाळ्यात तर तीन महिने सूर्याचे दर्शनच होत नाही. 11 नोव्हेंबर ते 2 फेब्रुवारीपर्यंत, गावात उन्हाचा बारीक कवडसा देखील येत नाही. सूर्याचे दर्शन न होणे ही आर्क्टिक वर्तुळातील देशांना नवी गोष्ट नाही. परंतु इटली आर्क्टिक प्रदेशात नाही. पिढ्यानपिढ्या, अशा सुर्यरहित हिवाळ्याची सवय झालेल्या गावकर्यांना 2005 मध्ये, महापौर पिअरफ्रान्को मिडाली यांनी नवीन स्वप्न दाखवले. सुमारे १ लाख युरो चा (८० लाख रुपये) निधी खर्चून या गावाने नोव्हेंबर 2006 पर्यंत, 1,100 मीटर उंचीवर पर्वताच्या विरुद्ध उतारावर 40 चौरस मीटर, 1.1 टन वजनाचा आरसा बसवला. संपूर्ण गाव उजळण्यासाठी हा आरसा अपुरा असला तरी, चर्चसमोरील म...